अमरावती शहरातील नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचे अध्ययन

प्रस्तावना :
आजच्या २१ व्या शतकातील स्त्री अभियांत्रिकी, डॉक्टर, वकिली या विविध क्षेत्रात चमकताना दिसत आहे. कधी समाजसुधारक बनून समाजाचे प्रश्न सोडवते, कधी न्यायाधीश बनून न्याय देते, तर कधी आई-बहिणीच्या रुपाने पूर्ण कुटुंबाला आधार देते. अशी ही स्त्री पुरुषाच्या खांदयाला खांदा लावून चालणारी, ताठ मानेने चालणारी ती स्त्री आज खरंच सक्षम झालेली आहे.

आज स्त्री पूर्णपणे स्वतंत्र आहे. एकविसाव्या शतकातील स्त्री आणि पूर्वीच्या काळातील स्त्री यांच्यात निश्चितच तफावत दिसून येत आहे. कुठे ती चुल नि मूल एवढयाच मर्यादेत राहणारी स्त्री आणि कुठे मुलाबाळांना घराला सांभाळून नोकरी करणारी आजची स्त्री. पण नाण्याला देान बाजू या ठरलेल्या असतात. आजची स्त्री खर्‍या अर्थाने स्वतंत्र झाली आहे का? तिला सर्व अधिकार आहेत का? हे प्रश्न अनुत्तीर्ण राहतात. उशीरा घरी येणा-या मुलाला विचारपुस करणारे कोणीच नसते. पण रात्री थोडया उशीराने घरी येणा-या मुलीला पा??मागुन टोमणे मारणारे बरेच असतात. आज जरी ती स्वतंत्र असली तरी रस्र्‍त्यावरुन चारचौघात तिला खाली मान घालुनच चालावे लागते. व त्याचबरोबर बलात्कार, लैंगिक छळ यासारख्या अत्याचारांना तिला सामोरे जावे लागते. बसमधुन जाताना, नोकरी करताना येणार्‍या संकटांना तोंड देऊन तिला पुढे जावे लागते.

संशोधनाची उद्दीष्टे :
शहरी भागात नोकरी करणार्‍या स्त्रियां सामाजिक स्थितीत होणार्‍या परिवर्तनाचे प्रमाण, परिवर्तनाचे स्वरुप आणि परिवर्तनासाठी जबाबदार असलेल्या कारणांचा शोध घेणे.
शहरी भागात नोकरी करणार्‍या स्त्रियांचा कार्यभार जाणणे.
नोकरी करणार्‍या स्त्रियांचा भ्‌मिकेसंबंधी अपेक्षा त्यांच्या दृष्टिकोनातून जाणण्याचा प्रयत्न करणे.
नोकरी करणार्‍या स्रीयांच्या सामाजिक अपेक्षांचा शोध घेणे.
नोकरी करणार्‍या स्रीयांचे कुटूंब व समाजातील स्थान व स्थितीचे निर्धारण करणे.
नोकरी करणार्‍या स्रीयांबद्दल पुरुषांच्या दृष्टिाकोन जाणुन घेणे ? त्यांचा परंपरागत व आधुनिक दृष्टिाकोन जाणण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षित नोकरी करणार्‍या स्रीयांच्या भुमिका, संधर्षाचे कारण जाणुन त्यांच्या द्वारे त्यांचे निराकरण करण्याचे ???? स्पष्ट करणे.
नोकरी करणार्‍या स्रीयांबदल नोकरी न करणार्‍या स्त्रियांचा दृष्टिाकोन जाणणे.

संशोधनाची साधने
प्रस्तुत संशोधनासाठी प्रश्नावली या संशोधन साधनाचा वापर करण्यात आला आहे.

निष्कर्ष
नोकरी न करणाऱ्या स्त्रियांच्या मतांवरून काढलेले निष्कर्ष :

 1. ग्रामीण क्षेत्रात नोकरी करणाऱ्या स्त्रियांची शहरी क्षेत्रातील नोकरी करणाऱ्या स्त्रियांपेक्षा स्थिती जास्त प्रतिष्टीत असल्याचे दिसून येते.
 2. नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा दर्जा नोकरी न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा उच्च असल्याचे दिसून येते.
 3. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना नोकरी न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा जास्त आर्थिक स्वातंत्र्य असल्याचे दिसून येते.
 4. नोकरी करणाऱ्या स्त्रियांची घरगुती स्त्रियांपेक्षा समाजात उच्च स्थिती आहे
 5. नोकरी करणाऱ्या स्त्रिया नोकरी न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा राजकीय क्षेत्रात जास्त सहभागी होतात
 6. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना नोकरी न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा कौटुंबिक निर्णय प्रक्रियेत महत्व पूर्ण स्थान दिल्या जाते
 7. नोकरी करणाऱ्या स्त्रिया नोकरी न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा  सामाजिक संघटनेत ( महिला मंडळ, भजन मंडळ इ.) जास्त सहभागी होतात
 8. नोकरी करणाऱ्या स्त्रिया नोकरी न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा  कायद्याच्या बाबतीत जास्त जागरूक  असल्याचे दिसून येते.
 9. नोकरी करणाऱ्या स्त्रिया नोकरी न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा सौंदर्या प्रती जास्त जागरूक असतात
 10. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना नोकरी न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा समाजात प्रगती करीता जास्त संधी लाभते
 11. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या कुटुंबात नोकरी न करणाऱ्या स्त्रियांच्या कुटुंबापेक्षा संघर्ष, तणाव जास्त होतात याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही.
 12. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना भूमिका संघर्षाला तोंड द्यावे लागतेच याविषयी निश्चित पणे सांगता येत नाही.
 13. नोकरी न करणाऱ्या स्त्रियांच्या मते नोकरी करणाऱ्या स्त्रियांची मुले ही जास्त प्रमाणात शिकतात
 14. नोकरी न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे कौटुंबिक जबाबदाऱ्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून होते.
 15. स्त्रियांनी नोकरी केल्यामुळे मुलांच्या स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होतो याबाबत निश्चितपणे  सांगता येत नाही.
 16. नोकरी करणाऱ्या स्त्रीचे पती वैवाहिक जीवनात संतुष्ट नसतात याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही.
 17. नोकरी न करणाऱ्या स्त्रियांच्या मते नोकरी करणाऱ्या स्त्रियांना संयुक्त कुटुंबात राहणे आवडत नाही

पुरुषांच्या मतांवरून काढलेले निष्कर्ष :

 1. स्त्रियांनी शिक्षण घ्रवून नोकरी करावी असे जास्तीत जास्त पुरुषांना आवडत असल्याचे दिसून येते.
 2. अधिकाधिक पुरुषांना नोकरी करणाऱ्या स्त्रिया या त्यांच्याच सारख्या वाटतात. म्हणजेच पुरुष नोकरी करणाऱ्या स्त्रियांना समानतेच्या भूमिकेतून पाहतात.
 3. अधिकाधिक पुरुषांना नोकरी करणाऱ्या स्त्रियांमुळे कुटुंबात संघर्षाचे वातावरण निर्माण होत नाही असे वाटते.
 4. जास्तीत जास्त पुरुषांना स्त्रियांनी नोकरी केल्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होते म्हणजेच नोकरी करणाऱ्या स्त्रिया मुलांना हवा तेवढा वेळ देवू शकत नाही.
 5. नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा दर्जा हा समाजात उच्च असे अधिकाधिक पुरुषांना वाटते.
 6. नोकरी करणाऱ्या स्त्रिया या अधिकाधिक पुरुषांना राजकारणात सक्रीय नसल्याचे वाटते.
 7. नोकरी करणाऱ्या स्त्रिया या जास्तीत जास्त पुरुषांना असे वाटते की धार्मिक कार्यात भाग घेत नाहीत
 8. अधिअधिक पुरुषांना च्या मते नोकरी करणाऱ्या स्त्रिया या कायद्यासंबंधी नोकरी न करणाऱ्या स्त्रियांपेक्षा अधिक जागरूक असतात.
 9. अधिकाधिक पुरुषांना असे वाटते की नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक  आहे.
 10. अधिकाधिक पुरुषांच्या मते नोकरी करणाऱ्या स्त्रिया कुटुंबात राहण्यास तयार नसतात

 

शिफारशी :
संशोधक अमरावती शहरातील नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या सामाजिक स्थितीचे अध्ययन या विषयावर संशोधन केले व त्यावरून काही शिफारशी स्त्रियांचा सामाजिक दर्जा सुधरण्यासाठी सुचवल्या:

 1. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी अधिकाधिक शिक्षण घेवून आपल्या नोकरी मध्ये प्रगती करावी. जेणे करून त्यांचा अधिकाधिक विकास होण्यास मदत होईल.
 2. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी नोकरी सांभाळून आपल्या कुटुंबाकडे सुद्धा लक्ष द्यावे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नये.
 3. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी स्व:ता च्या स्वास्थ्याकडे सुद्धा अधिक लक्ष दिले गेले पाहिजे.
 4. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आर्थिक स्वतंत्र्य असल्याने आपल्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन व्यवस्थित पद्धतीने करून आपल्या कुटुंबाचा विकास करण्यावर भर द्यावा.
 5. नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक असल्याने तो टाळण्यासाठी आपल्या कुटुंबात संघर्ष निर्माण होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
 6. नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी त्यांना नोकरीत प्राधान्य द्यावे व त्याना संधी उपलब्ध करून ध्यावी.
 7. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना सामाजिक संघटनेत सहभागी करून घेऊन त्यांना समाजकार्य करण्यास उतेजीत करावे.
 8. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनि सामाजिक कार्य करावे यासाठी समाजाने त्यांना अनुकूल वातावरण तयार करून ध्यावे तसेच शासनाने  व समाजाने त्यांना पुरस्कृत करावे.
 9. नोकरी करणाऱ्या स्त्रियां जर आपल्या नोकरीत जर चांगले कार्य करत असतील तर शासनाने  व समाजाने त्यांचा गोरव करावा. त्यावरूनच इतर कर्मचारी वर्गाला प्ररणा मिळते.
 10. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना समाजाने महिला मंडळात सहभागी करून अधिक विविध प्रकारची मंडळे स्थापन करून स्त्रियांचा विकास साधून आणावा.
 11. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या पतीने हि सहकार्य करावे व त्यांच्या कार्यास हातभार लाऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवावा. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनकडे पाहण्याचा नकारात्मक दृष्टीकोन समाजाने बदलावा. व त्यांना सामाजिक दर्जा प्राप्त करून देण्यास उतेजीत करावे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना समाजाने आदर, सन्मान, आपुलकी, व मान ध्यावा.
 12. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना कायदेविषयक माहिती ध्यावी, स्त्रियांची कायद्या संमंधी जागृता वाढावी ह्यासाठी  कायदेविषयक सल्ला देणारी केंद्र कार्यलयात ठेवावी.
 13. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना कायदेविषयक संरक्षण ध्यावे.