दारू प्राशन करणाऱ्या पुरुषांचे महिलांवर होणारे अत्याचार - एक अध्ययन

मद्यं हृदयमाविश्‍य स्वगुणैरोजसो गुणान्‌ । 
दशभिर्दश संक्षोभ्य चेतो नयति विक्रियाम्‌ ।। ...चरक चिकित्सास्थान

मद्य (व इतर व्यसन द्रव्ये) शरीरात गेल्याबरोबर हृदयावर आपला प्रभाव टाकतात आणि स्वतःच्या दहा गुणांनी (लघू, उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, अम्ल, व्यवायी, आशुकारी, रुक्ष, विकासी,विशद) ओजाच्या दहा गुणांमध्ये (गुरु, शीत, मृदू, श्‍लक्ष्ण, बहल, मधुर, स्थिर, प्रसन्न, पिच्छिल, स्निग्ध) क्षोभ उत्पन्न करून मनामध्ये विकृती निर्माण करतात.
आजच्या या आधुनिक काळात दारूपान हे एक आगळ्या वेगळ्या स्वरूपाचे होऊन बसले आहे या काळात दारूसेवन कोणतीही सामान्य व्यक्ती करते. या काळात कुणी दुसऱ्याला साथ देण्यासाठी, कोणी आपली शारीरिक कमजोरी कमी होण्यासाठी कुणी आपल्या समोर असलेल्या संकटाना तोंड देण्याचे सामर्थ आपल्यात यावे यासाठी दारू प्राशन करतात.
पाश्चिमात्य देशात झुकल्यास आपणास असे आढळून येईल दारू सेवन करण्याचे प्रमाण फारच आहे. त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्याचे आदरातिथ्य ते दारूच्या बाटलीने करतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. तेथील दारूपान हे एक “हाय क्लास” म्हणून मान्यता पावले आहे. पाश्चिमात्य देशामध्ये मध्यपान करण्यास पुरुषांची साथ देण्याकरिता स्त्रियसुद्धा असतात. हा प्रकार भारतीयांमध्ये कमी प्रमाणात आढळतो.

संशोधनाची उद्धिष्ट:

 1. दारूपान करणाऱ्या पुरुषांची त्याच्या पत्नीवर होणाऱ्या अत्याचारा संबंधी वैयक्तिक,कौटुंबिक,शारीरिक,लैंगिक,भवनीक,आर्थिक,सामाजिक माहिती अभ्यासणे.
 2. दारूचे व्यसन निर्माण होण्यास जबाबदार धारकाची माहिती अभ्यासणे.
 3. व्यसनाच्या परिणामाची माहिती अभ्यासणे.
 4. दारू व्यसना सोबत इतर व्यसनाची माहिती अभ्यासणे.

नमुना निवड:
नमुना म्हणजे संपूर्ण समुहाचा किंवा समग्राचा एक निवडलेला भाग म्हणजे एक संख्याकीय नमुना होय.- श्रीमती यंग
प्रस्तुत विषयाच्या अध्ययनाकरिता जनगणना पद्धतीचा उपयोग केला. जनगणना पद्धतीचा उपयोग करून उत्तरदात्याक्डून मुलाखत अनुसूचि भरून घेण्यात आली.
निष्कर्ष :

 1. सर्वाअधिक महिला मजुरी करणाऱ्या आहेत.
 2. सर्वाअधिक महिला कमीतकमी उत्पन्न मिळवणाऱ्या आहेत.
 3. सर्वाअधिक महिला ह्या विवाहित, मराठी मातृभाषा असणाऱ्या आहेत.
 4. सर्वाअधिक महिला ह्या प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या आहेत.
 5. सर्वाअधिक महिलांचे पती व्यसनाधीन आहे त्या सर्व महिलांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याचे दिसून आले.
 6. या महिलांना मिळणारे उत्पन्न त्यांच्या उदर निर्वाहासाठी पुरेसे नाही.
 7. अधिकाधिक महिला या संयुक्त कुटुंबातील आहेत.
 8. सर्वाअधिक महिलांचे घर हे स्वताच्या मालकीचे नाही.
 9. घरातील सर्व व्यक्ती त्यांच्यावर अवलंबून आहेत.
 10. सर्व महिलांच्या घरी कोणाला ना कोणाला व्यसन आहे.
 11. बऱ्याच लोकांचे दारू पिण्याचे व्यसन सवयीमुळे लागले आहे.
 12. बऱ्याच घरातील पुरुष हे हातभट्टी वरची दारू पितात.
 13. दारू मुळे जुगार , सट्टा या सारख्या सवयी लागल्या.
 14. दारू बरोबर इतरही मादक पदार्थाचे सेवन करतात.
 15. दारू नियमित घेतात.
 16. दारू पिण्यामुळे इतरही व्याधी निर्माण झाल्यात.
 17. दारू पिल्यामुळे चोरी , भांडण , बलात्कार या सारखे गुन्हे घडले आहेत.
 18. दारू पिण्यामुळे पुरुष स्त्रियांवर भावनिक, मानसिक व शारीरिक हिंसा करतात.
 19. जास्तीत जास्त पुरुषांना दारूचे व्यसन स्वत: मुलेच लागले आहे.

शिफारशी :
(1) दारू सेवन करणाऱ्या पुरुषाना आर्थिक मिळकत वाढविण्यासाठी रोजगार उपलब्ध करून ध्यावे.
(2) दारू सेवन करणाऱ्या पुरुषाना विविध सामाजिक उपक्रमात, मनोरंजनात, सहभागी करून घ्यावे.
(3) व्यसनी व्यक्तींना व्यसन मुक्त करावे.
(4) दारूचे दुष्परिणाम पटून घ्यावे.
(5) व्यसनी व्यक्तींन कडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजीतील लोकांनी बदलावा.
(6) खेडोपाडी व्यसन मुक्ती कंद्र सुरु करावे.
(7) व्यसन मुक्ती केंद्राद्वारे व्यसनी लोकांना व्यसन मुक्त करावे.
(8) व्यसनी व्यक्तींचा त्रास पत्नीला होऊ नये याची सामाजिक दृष्ट्या काळजी घ्यावि.
(9) व्यसनी व्यक्तींच्या जीवनावर व त्यांच्या इतर कोटुबिक जीवावर कोणतीही हानी होणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात.
(10) पोलीस व कायद्ये यंत्रणा अधिक प्रभावी करावी.